Mahalaxmi Saras 2023-24: मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानावर महालक्ष्मी सरस मेळाव्यात मुंबईकर विविध खाद्यपदार्थ आणि हस्तकलांचा आनंद लुटत आहे. २६ डिसेंबरपासून सुरु झालेला हा मेळावा ७ जानेवारीपर्यंत असणार आहे.
(1 / 8)
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी सरस २०२३-२४ या मेळाव्याचे २६ डिसेंबरला मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील एमएमआरडीएच्या मैदानावर उत्साहात सुरुवात झाली. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे.
(2 / 8)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाशी (एमएसआरएलएम) संबंधित असलेल्या उमेद या उपक्रमाच्या सहकार्याने केंद्र सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचे ग्रामीण विकास विभाग यांच्याद्वारे २००६ पासून दरवर्षी महालक्ष्मी सरस मेळा आयोजित केले जाते
(3 / 8)
बचत गट (एसएचजी), ग्रामीण भागातील कुशल कारागीर, कलाकार, शेतकरी आणि अन्य भागधारकांना त्यांची उत्पादने ग्राहकांसमोर आणण्यात तसेच शहरी ग्राहकांशी थेट संबध जोडण्यासाठी हा मेळा अतिशय उपयुक्त ठरला आहे.
(4 / 8)
यंदाच्या उत्सवात ५०० हून अधिक स्टॉल्स आहेत. विशेष म्हणजे नाबार्डने देशभरातील विविध कारागिरांच्या ४९ स्टॉल्ससाठी मदत देत मेळ्याच्या अनोख्या योजनेमध्ये योगदान दिलेले आहे.
(5 / 8)
या स्टॉल्सच्या माध्यमातून आसामी गामोचा, पोचमपल्ली साड्या, बनारसी साड्या, टांगलिया उत्पादने मुंबईकरांच्या पसंतीस उतरत आहेत.
(6 / 8)
स्वयंम बचत गट (एसएचजी), शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि बिगर शेतकरी उत्पादक संस्था (ओएफपीओ) तील सुमारे १०० ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी नाबार्ड मदत करत आहे.
(7 / 8)
विविध हस्तकला, वस्तूंसोबतच्या विक्रीसोबतच खाद्यपदार्थांचे बरेच पर्याय चाखायला मिळत आहे. मुंबईकर खवैय्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेजच्या विविध पदार्थांची मेजवाणी आहे.
(8 / 8)
प्रदर्शनाचा समारोप ७ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, याला प्रचंड प्रतिसाद पहायला मिळत आहे.