महाकुंभमध्ये व्हायरल झालेली हर्षा रिछालिया निरंजनी अखाड्याच्या साधू संतांसोबत रथातून शाही स्नानासाठी संगम घाटावर रवाना झाली. एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले की, शाही स्नानाने स्वत:ला तृप्त करून घेतले.
शाही स्नानाची तयारी मंगळवारी पहाटेपासूनच निरंजनी आखाड्याच्या शिबिरात सुरू झाल्या होत्या. यावेळी अनेक विधी करत प्रथा-परंपरांचे पालन केले गेले. हर्षाही साधू संतांसोबत पूजा विधीमध्ये उपस्थित होती.
निरंजनी आखाड्याच्या संतांसोबत जेव्हा हर्षा संगमाकडे शाही स्नान करण्यासाठी निघाली तेव्हा सूर्योदयही झाला नव्हता. कडाक्याच्या थंडीमुळे तिने भगव्या वस्त्रासोबत भगवी शालही पांघरली होती. निरंजनी आखाड्याच्या शिबिरातून निघाल्यानंतर रथापर्यंत जाऊपर्यंत ती संपूर्ण रस्त्यात हात जोडून चालत होती. तिचे फोटो घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. यावेळी तिला ज्या कॅमरामन व मीडियाकर्मींनी तिला व्हायरल केले होते, त्यांचे आभार तिने होत जोडून व कंबरेत वाकून केले.
रथातून उतरल्यानंतर हर्षा संगमाकडे जाताना पायात चप्पल न घातला अनवाणी चालताना दिसत होती. यावेळी तिच्याशी बोलण्यासाठी व तिचे फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसली. अनेकांनी तिच्यासोबत सेल्फी घेतली.
संगम तटावर पोहोचल्यानंतर संत व स्वयंसेवकांच्या गराड्यात हर्षाने डुबकी घेतली. हर्षा रिछालिया शनिवारी मीडियाशी संवाद साधताना स्वत: साध्वी असल्याचे म्हटले होते. तिला महाकुंभमधील सर्वात सुंदर साध्वी म्हटले गेले. दोन दिवस ती सर्वात सुंदर साध्वीची उपमा घेऊन खुश राहिली. मात्र सोमवारी आपल्या बोलण्यावरून पलटी मारत म्हटले की, ती अजून साध्वी बनलेली नाही. बनण्याच्या मार्गावर आहे.
स्वत:ला साध्वी म्हणण्यापासून परावृत्त होण्यामागे हर्षाचे काही फोटो व व्हिडिओ असल्याचे मानले जात आहे. हर्षाने दोन वर्षापूर्वी साध्वी बनल्याचे म्हटले होते. मात्र तिच्या इंस्ट्राग्राम आणि सोशल मीडियावर काही असे फोटो मिळाले ज्यात ती दोन महिन्याआधीपर्यंत अँकरिंग करताना दिसून आली.
हर्षाचे इस्टाग्रामवर जवळपास १० लाखाहून अधिक फालोअर्स आहेत, त्यापैकी जवळपास निम्मे फॉलोअर्स गेल्या तीन दिवसात म्हणजेच महाकुंभमध्ये आल्यानंतर व व्हायरल झाल्यानंतर बनले आहेत. इस्टाग्रामवरही हर्षा अधिक करून हिंदू, सनातन धर्म आणि हिंदुत्वाबाबत बोलताना दिसते.