Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये १९५४ ते २०२५ पर्यंत चेंगराचेंगरीची राहिली आहे परंपरा, कधी-कधी घडल्या आहेत दुर्घटना?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये १९५४ ते २०२५ पर्यंत चेंगराचेंगरीची राहिली आहे परंपरा, कधी-कधी घडल्या आहेत दुर्घटना?

Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये १९५४ ते २०२५ पर्यंत चेंगराचेंगरीची राहिली आहे परंपरा, कधी-कधी घडल्या आहेत दुर्घटना?

Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये १९५४ ते २०२५ पर्यंत चेंगराचेंगरीची राहिली आहे परंपरा, कधी-कधी घडल्या आहेत दुर्घटना?

Jan 29, 2025 04:16 PM IST
  • twitter
  • twitter
Mahakumbh Mela Stampede : प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्त देशविदेशातील भाविक संगम तटासह अनेक ठिकाणी प्रयागराजमध्ये गंगा स्नान करतात. मौनी अमावस्येसह अशा काही तिथी असतात जेव्हा गंगा स्थान पवित्र मानले जाते. 
मौनी अमावस्येला संगमावर मोठी गर्दी होत असते व अनेकवेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. महाकुंभमध्ये बुधवारी सकाळीही चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
twitterfacebook
share
(1 / 7)

(REUTERS)
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना नव्या नाहीत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा १९५४ मध्ये महाकुंभचे आयोजन केले होते. हा स्वतंत्र भारताचा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. मात्र ३ फेब्रुवारी १९५४ रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. महाकुंभच्या इतिहासात ही सर्वात मोठी दुर्घटना होती.
twitterfacebook
share
(2 / 7)

त्यानंतर १९८६ मध्ये हरिद्वार मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. यात कमीत कमी २०० लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादुर सिंह देशातील अनेक मुख्यमंत्री व खासदारांना घेऊन संगमावर गेल्यानंतर ही घटना घडली होती. सामान्य लोकांना संगमावर जाण्यापासून प्रशासनाने रोखले होते. य़ामुळे गर्दी अनियंत्रित झाली व चेंगराचेंगरी झाली होती.
twitterfacebook
share
(3 / 7)

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे २००३ मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात डझनभर लोक मृत्युमुखी पडले होते. लाखोंच्या संख्येने लोक गोदावरी किनारी स्नानासाठी गेल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये शेकडो लोक गंभीररित्या जखमी झाले होते.
twitterfacebook
share
(4 / 7)

(PTI)
प्रयागराज महाकुंभमध्ये २०१३ मध्येही चेंगराचेंगरी झाली होती. मात्र ही दुर्घटना गंगा किनारी झाली नव्हती तर अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर जाली होती. १० फेब्रुवारी २०१३ रोजी फुट ओव्हरब्रीज कोसळल्यामुळे हा अपघात झाला होता. यामुळे चेंगराचेंगरी झाली व ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर ४५ लोक जखमी झाले होते.
twitterfacebook
share
(5 / 7)

आता २०२५ मध्येही अशीच घटना घडली आहे. सुरुळितपणे चाललेल्या कुंभमेळ्यात बुधवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. य़ामध्ये काही जण मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर शेकडो जखमी झाले आहेत.
twitterfacebook
share
(6 / 7)

मौनी अमावस्या, पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, वसंत पंचमी, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक जमतात. आजही मौनी अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येने लोक जमले होते. आज जवळपास ४ कोटी लोकांनी संगमावर स्नान केले.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज