उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ४५ दिवसांच्या महाकुंभ महोत्सवात सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. या ठिकाणी आलेल्या परदेशी भाविकांमध्ये मोठा खूप उत्साह दिसून येत आहे. परदेशी हिंदू भाविक 'जय श्री राम' च्या घोषणा देत असल्याचं दिसून येत आहे.
(AP)प्रयागराजच्या महाकुंभात पोहोचल्यानंतर परदेशी पर्यटक खूप आनंदी दिसत होते. या पर्यटकांपैकी एकाने सांगितले, 'हा एक अतिशय अनोखा मेळा आहे. आमचा येथे राहण्याचा अनुभव खूप छान असून येथील वातावरण आनंददाई असल्याचं एका परदेशी भाविक महिलेनं म्हटलं. .
परदेशी भाविकांसोबत देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक या कुंभमळा येथे आले आहे. हे भाविक परदेशी भाविकांसोबत मिसळले असून त्यांच्या सोबत अनेकांनी सेल्फी काढले. यावेळी या पूर्वीच्या कुंभमेळ्याचे अनुभव देखील त्यांनी एकमेकांशी शेअर केले.
दिवंगत अॅपल सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स देखील प्रयागराजला पोहोचल्या. रविवारी, त्यांना महाकुंभातील निरंजनी आखाड्याजवळ दिसल्या. ऐवढेच नाही तर त्यांनी भगवे कपडेही घातले होते.
(ANI)युरोपातील क्रोएशिया येथील महामंडलेश्वर ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या परदेशी भक्तांसह प्रयागराजच्या महाकुंभ शहरात पोहोचले. ते आत्मानंद पुरी महाराजांच्या आखाड्याजवळ त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांसह दिसले. त्यांनी या कुंभमेळाव्याचे वर्णन दिव्य असे केले.
परदेशी नागरिकांनी सांगितले की, ते प्रयागराजमध्ये महाकुंभाच्या आयोजनाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आज इथे आल्यानंतर खूप बरे वाटत आहे. कुंभ मेळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले आहेत, हा एक वेगळा व दिव्य अनुभव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.