महाकुंभ हा दर १२ वर्षांनी येणारा एक सोहळा आहे, ज्यामध्ये बहुतेक हिंदू संगमात डुबकी मारून पवित्र स्नान करू इच्छितात. तथापि, यावेळी प्रयागराजमध्ये असे काही दिसले, ज्यामुळे लोकांना थोडे आश्चर्य वाटले. यावेळी भारत आणि परदेशातील असे अनेक सेलिब्रिटी महाकुंभात स्नान करताना दिसले, जे धर्माने हिंदू नव्हते तर मुस्लिम आणि ख्रिश्चन होते.
महाकुंभमध्ये पूनम पांडेला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. ती तिच्या प्रतिमेच्या अगदी उलट वागताना दिसली. यावेळी ती प्रयागराजच्या रंगात रंगलेली दिसली. तिने महाकाल लिहिलेला कुर्ता घातला होता आणि स्कार्फने डोकंही झाकलं होतं. यावेळी तिने गंगेत स्नान केले.
रेमो डिसूझा चेहरा लपवत कुंभला गेला. जेव्हा त्याचे फोटो समोर आले, तेव्हा लोक चर्चा करू लागले की रेमोने धर्म बदलला आहे. रेमो डिसूजाचे खरे नाव रमेश गोपी अय्यर आहे आणि त्याने अनेक वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र, त्याने पूर्ण भक्तिभावाने संगमात स्नान केले.
रेमोपेक्षा दिग्दर्शक कबीर खानला प्रयागराजमध्ये पाहून लोकांना जास्त आश्चर्य वाटले. याबाबत त्याला विचारले असता, कबीर यांनी अतिशय चोख उत्तर दिले. हा हिंदू-मुस्लिमचा प्रश्न नसून देश आणि सभ्यतेचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. कुंभमध्ये येऊन आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.
कोल्डप्ले सिंगर ख्रिस मार्टिनला कुंभमध्ये पाहून लोकांना धक्काच बसला होता. सोमवारी २७ जानेवारी रोजी गळ्यात भगवा पंचा घेऊन तो कारमधून प्रयागराजला पोहोचला होता. यावेळी त्याने पॅप्ससाठी पोज दिली.
प्रयागराजमध्ये क्रिस मार्टिनची गर्लफ्रेंड हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉनसनही त्याच्यासोबत होती. ख्रिस आणि डकोटा १६ जानेवारीला त्यांच्या संगीत बँडच्या टूरसाठी भारतात आले होते.
बॉक्सर मेरी कोम कुंभला पोहोचली होती. संगमामध्ये स्नान केल्यानंतरची तिची झलकही व्हायरल झाली होती. मेरी कोमने असेही म्हटले होते की, ती ख्रिश्चन आहे पण कुंभमध्ये येण्यामागील तिची श्रद्धा हिंदूंसारखीच आहे.