महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. माघ महिन्यातील शिवरात्री ही विशेष फलदायी ठरते. या शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा कशी करावी, शास्त्र काय सांगते, जाणून घ्या.
पुराणानुसार शिवलिंग किंवा भगवान शिवाची मूर्ती घरामध्ये नेहमी ईशान्य दिशेला असावी. असे केल्यास भगवान शंकराची कृपा प्राप्त होईल. शिवलिंग ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने अपघात टळतात. ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवणार आहात ती जागा स्वच्छ करून मगच शिवलिंग ठेवावे.
पुराणानुसार भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती ध्यानाअवस्थेत असलेली ठेवणे चांगले असते. असा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने सर्व सुख मिळते असे म्हणतात. म्हणून जर तुम्ही घरी भगवान शंकराची प्रतिमा ठेवली असेल तर त्यांची ध्यान मूर्ती ठेवणे चांगले.
शास्त्रानुसार काळ्या रंगाचे शिवलिंग निवडावे. पांढऱ्या शिवलिंगाची पूजा करू नये असे शास्त्र सांगते. पांढऱ्या रंगाचे शिवलिंग संन्यासाचे प्रतीक मानले जाते. घरातील काळे शिवलिंग खूप फायदेशीर असते.
शिवपुराणानुसार नर्मदा नदीच्या काठावर दगडांनी बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. देवघरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नका. ज्या भांड्यात शिवलिंग ठेवले जाते ते भांडे सोने, चांदी आणि तांब्याचे असणे चांगले.