पौराणिक कथेनुसार, विघ्नांचा नाश करणाऱ्या श्रीगणेशाचा जन्म माघ महिन्यातील शुक्लपक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता. भारतभर याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. याला माघी विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात.
सनातन धर्मात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते. जाणून घ्या माघी गणेश चतुर्थी कधी आहे.
पंचांग दिनदर्शिकेनुसार १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. चतुर्थी तिथी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल आणि २ फेब्रुवारीपर्यंत चालेल. म्हणजेच गणेश जयंती २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. याला माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात.
सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत गणेश जयंती पूजा होणार आहे. पूजेसाठी दोन तास दोन मिनिटे शुभ मुहूर्त मिळेल . यंदा गणेश जयंतीला रवियोग जुळून येत आहे. रवियोग दुसऱ्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपासून दुपारी २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चालणार आहे.