माघ महिना सुरू झाला आहे. या महिन्याचे विशेष महत्त्व असून या विशेष महिन्यात अनेक सण येतात, वरद चतुर्थी हा त्यापैकीच एक. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. वरद चतुर्थीचे व्रत गणपतीला समर्पित केले जाते.
या दिवशी तीळ आणि कुंडाच्या फुलांनी गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वरद चतुर्थी १ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल. गणपतीला तीळ आणि कुंदाची फुले फार प्रिय आहेत. काही लोक या दिवशी गणपतीला लाडू देखील अर्पण करतात. चला जाणून घेऊया वरद चतुर्थीची तारीख, पूजेची वेळ आणि पूजा पद्धत.
माघी गणेश चतुर्थी तिथी :
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १ फेब्रुवारी २०२५, सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होते, आणि २ फेब्रुवारी २०२५ राजी सकाळी ०९ वाजून १४ मिनिटांनी. समाप्त होईल.
वरद चतुर्थी पूजा मुहूर्त :
०१ फेब्रुवारी २०२५, सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत. १ फेब्रुवारी रोजी वरद चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे..
(Freepik)वरद चतुर्थी पूजा विधी -
वरद चतुर्थी भगवान गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. ब्रह्म मुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी श्री गणपतीची पूजा केली जाते.
माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर आसनावर बसून श्री गणपतीची पूजा करावी.
पूजेदरम्यान गणपतीला धूप आणि दिवे अर्पण करावेत. आता श्री गणेशाला फळे, फुले, तांदूळ, माऊली किंवा धागा अर्पण करा.
पंचामृताने स्नान केल्यानंतर लाडू आणि तीळ किंवा तीळ-गूळ यांच्यापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा. गणपतीची पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे.
पूजेनंतर ॐ श्री गणेशाय नम: चा १०८ वेळा जप करावा. संध्याकाळी व्रतकथा ऐका आणि देवाची आरती करा. शास्त्रानुसार या दिवशी उबदार कपडे, ब्लँकेट, कपडे आणि तीळ इत्यादींचे दान करावे.
वरद चतुर्थीला गणेश पूजेचे महत्त्व -
वरद चतुर्थीला श्री गणपतीची पूजा केल्याने शांती आणि आनंद मिळतो. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. बाप्पा आपल्या भक्तांना धन, ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. त्याचबरोबर जीवनातील सर्व संकटे दूर करण्याचे आशीर्वादही प्राप्त होतात.
(HT)