मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  March Amavasya : अमावस्या ९ की १० तारखेला? वाचा स्नान-दानाची शुभ वेळ आणि कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी उपाय

March Amavasya : अमावस्या ९ की १० तारखेला? वाचा स्नान-दानाची शुभ वेळ आणि कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी उपाय

Mar 07, 2024 02:44 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

March Amavasya 2024 : अमावस्येला पितरांची पूजा, स्नान-दान केल्याने भोलेनाथ, पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो. मार्च महिन्यात अमावस्या कधी आहे? ९ की १० तारखेला जाणून घ्या.

एका वर्षात १२ अमावस्या तिथी येतात. मार्च महिन्यात रविवारी १० तारखेला अमावस्या असून, या दिवशी तीर्थस्थानी पवित्र नदीत स्नान करणे, दान-धर्म करणे, तर्पण अर्पण करून श्राद्ध केल्यास पितरांची व देवांची कृपा प्राप्त होते. वाचा स्नान-दानाची शुभ वेळ, तसेच कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी काय करावे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी १० मार्च २०२४ रोजी येणारी अमावस्या माघी अमावस्या असून, 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

अमावस्या प्रारंभ व समाप्ती वेळ आणि स्नानाचा शुभ मुहूर्त :पंचांगानुसार, माघ अमावस्या ९ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६:१७ वाजता सुरू होईल आणि १० मार्च २०२४ रोजी दुपारी २:२९ वाजता समाप्त होईल. शास्त्रानुसार, उदयातिथीनुसार अमावस्या वैध आहे, म्हणून माघ अमावस्या १० मार्च रोजी असेल. या दिवशी स्नानाची वेळ पहाटे ४:४९ ते ५:४८ पर्यंत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

अमावस्येला काय करावे एका भांड्यात पाणी, चंपा, जुही किंवा मालतीची पांढरी फुले, काळे तीळ टाकून ते पाणी पितरांना माघ अमावस्येला अर्पण करावे. जल अर्पण करण्यासाठी तळहातात पाणी घेऊन अंगठ्याच्या दिशेने अर्पण करावे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

पुराण शास्त्रानुसार तळहाताच्या ज्या भागामध्ये अंगठा असतो त्याला पितृतीर्थ म्हणतात. तर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० दरम्यान आहे. असे मानले जाते की हे तर्पण पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करते आणि ते त्यांच्या वंशजांना समृद्धीचे आशीर्वाद देतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

माघ अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत ५ लाल फुले आणि ५ दिवे अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे आर्थिक लाभ होतो. आर्थिक संकटावर मात होते. यशाच्या वाटेवर वाटचाल होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपायअमावास्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद नांदते. या दिवशी ब्राह्मणांना धनधान्य व अन्न दान करा. हे कालसर्प आणि पितृदोष दूर करते असे मानले जाते. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

इतर गॅलरीज