मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  मी नक्कल करताना घाबरलो होतो; ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये कुशल बद्रिके करणार चंकी पांडेची मिमिक्री

मी नक्कल करताना घाबरलो होतो; ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये कुशल बद्रिके करणार चंकी पांडेची मिमिक्री

May 16, 2024 12:42 PM IST Aarti Vilas Borade

  • ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात कुशल बद्रिके अभिनेते चंकी पांडेची नक्कल करताना दिसणार आहे. याविषयी त्याने वक्तव्य देखील केले आहे.

सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात मराठी विनोदवीर कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे दिसत आहे. तिघेही आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरत आहेत. येत्या भागात कुशल बद्रिके असे काही सादर करणार आहे सर्वजण चकीत होणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेते चंकी पांडे हजेरी लावणार आहेत. या भागात कुशल बद्रिके, गौरव दूबे आणि कावेरी प्रियम एक मस्त स्केच सादर करतील, ज्यात कुशल बद्रिके चंकी पांडेने उभी केलेली ‘आखरी पास्ता’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

स्कीटमध्ये कुशल एक कुक बनला आहे, जो किचनमधल्या गोष्टींना एक मसालेदार वळण देताना दिसणार आहे. त्याचा हा अॅक्ट पाहून चंकी पांडे आणि ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशी स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

आपल्या या गँगविषयी बोलताना कुशल बद्रिके म्हणतो, “आखरी पास्ताची नक्कल करताना मी मनातून घाबरलो होतो कारण प्रत्यक्ष आखरी पास्ताच्या समोर मला ती नक्कल करायची होती. पण मला आनंद वाटतो, की चंकी पांडे जींना मी उभी केलेली त्यांची ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा आवडली! गौरव दूबे आणि कावेरी प्रियम सोबत काम करायला मजा आली. ते फार हुशार विनोदवीर आहेत. मंचावरच्या आमच्या केमिस्ट्रीमुळे गॅगची रंगत आणखी वाढली.”
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ कार्यक्रमाच्या येत्या रविवारच्या भागात कुशल बद्रिकेचा हा आखरी पास्ता या भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ कार्यक्रमाच्या येत्या रविवारच्या भागात कुशल बद्रिकेचा हा आखरी पास्ता या भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज