अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने सध्या 'डान्स दिवाने' शोला जज करताना दिसत आहे. याशिवाय ती तिच्या इतर प्रोजेक्टमध्येही व्यस्त आहे. मात्र, एक काळ असा होता की, माधुरी दीक्षितने लग्नानंतर चांगले करिअर सोडले होते. कसलाही विचार न करता, तिने फक्त आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच एका मुलाखतीत तिने आपल्या करिअरमधून ८ वर्षांचा ब्रेक घेण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हा निर्णय का घेतला? वाचा…
माधुरी दीक्षितने १९९९मध्ये लग्न केले. लग्नानंतर ती दीर्घकाळ ब्रेकवर गेली. या काळात तिच्या चाहत्यांचीही निराशा झाली होती. २००७मध्ये 'आजा नचले' या चित्रपटाद्वारे माधुरी दीक्षितने पुनरागमन केले. तेव्हापासून आजतागायत ती सतत इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
(Instagram/@madhuridixtnene)माधुरी दीक्षितने तिच्या निर्णयाबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी माझ्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांपैकी हे एक स्वप्न आहे. एक कुटुंब असणे ही एक गोष्ट आहे. ज्याला मी नेहमीच प्राधान्य दिले होते. मी चित्रपट न करण्याबद्दल किंवा कुटुंबासह आनंदी राहण्याबद्दल कधीही दु:खी नव्हते.’
(Instagram )माधुरीने १९९९मध्ये लॉस एंजेलिसच्या कार्डिओव्हस्कुलर सर्जन डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. माधुरी आणि श्रीराम नेने या जोडीला २००३मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांनी या मुलाचे नाव अरिन ठेवले. त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांचा दुसरा मुलगा रायनचा जन्म झाला.
(Instagram/@madhuridixitnene)