बॉलिवूडची लाडकी ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘पंचक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सध्या माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
(Instagram/@madhuridixitnene)आता नव्या वर्षाचे स्वागत करताना, चाहत्यांना शुभेच्छा देत माधुरी दीक्षित हिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित साडी लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
(Instagram/@madhuridixitnene)अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सुंदर आकाशी रंगाची नेट साडी नेसली आहे. या साडीवर सुंदर एमब्रॉयडरी करण्यात आली आहे. या लूकमध्ये माधुरी दीक्षित कमालीची सुंदर दिसत आहे.
(Instagram/@madhuridixitnene)माधुरी दीक्षितची ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने ही साडी डिझाईन केली होती. तर, सेलिब्रिटी स्टायलिश मोहित राय याने हा लूक डिझाईन केला आहे.
(Instagram/@madhuridixitnene)