बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या 'डान्स दिवाने' या लोकप्रिय शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. आता या शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.
माधुरी दीक्षितने या शोच्या सेटवर तिचा एक आयकॉनिक लुक पुन्हा क्रिएट केला आहे, जो पाहून चाहतेही नॉस्टॅल्जिक झाले.
माधुरी दीक्षितच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटातील तिचा एक लूक तुफान व्हायरल झाला होता. या चित्रपटातील 'दीदी तेरा देवर दीवाना' या लोकप्रिय गाण्यात अभिनेत्रीने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसची जादू आजही प्रेक्षकांवर दिसते.
माधुरी दीक्षितचा हा आयकॉनिक लूक लोक अजूनही कॉपी करत आहेत. बॉलिवूडच्या थीम पार्ट्यांमध्ये लोक अनेकदा या लूकमध्ये दिसतात. पण, आता माधुरी दीक्षित स्वतः हा लूक रिक्रिएट करताना दिसली आहे.
आता तिचे या लूकमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुन्हा एकदा अभिनेत्रीला या लूकमध्ये पाहून, चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.