आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित दीक्षित हिने आपल्या सौंदर्याने देखील सगळ्यांना नेहमीच घायाळ केलं आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने माधुरी दीक्षित हिने एक सुंदर फोटोशूट केले आहे.
(All Photo: Madhuri Dixit/IG)बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने मकर संक्रांतीच्या निमित्ताने पिवळ्या साडीत सुंदर मनमोहक फोटोशूट केले आहे. यात माधुरी दीक्षित हिच्या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
माधुरी दीक्षित हिने मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या पिवळ्या रंगाच्या साडीला गोल्डन किनार होती.
केसांचा आंबाडा, हलका मेकअप, नाकात नथ, केसांमध्ये गजरा या लूकमध्ये माधुरी दीक्षित हिने आपल्या बावनकशी सौंदर्याचा जलवा दाखवला.