Madhuri Dixit 10 stunning photo: माधुरी दीक्षितने तिचा ५७ वाढदिवस नुकताच साजरा केला. वयाच्या ६० कडे वाटचाल करणाऱ्या माधुरीचे सौन्दर्य आजही अनेकांना घायाळ करते. माधुरी ही बॉलीवूडमध्ये अनेक दशकांपासून प्रमुख अभिनेत्री राहली आहे. तिने तिच्या अभिनय व नृत्य कौशल्याने जगभरातील प्रेक्षकांना मोहित केले आहे.
(1 / 10)
अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० दशकातील भारतीय चित्रपट सृष्टिचा प्रमुख चेहेरा राहिली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरायवर अनेक सुपर हीट चित्रपट केले आहेत. चित्रपट सृष्टीत धक धक गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आजही तिच्या सौंदर्याने वेड लावते.
(2 / 10)
खऱ्या अर्थाने सुपरस्टार असलेल्या माधुरीने तिच्या सौंदर्याने रुपेरी पडद्यावर राज्य केले. माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयाच्या जोरावर तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना मोहिनी घातली आहे.
(3 / 10)
अभिनया सोबत तिच्या नृत्याचेही अनेक जण चाहते आहेत. बुधवारी माधुरीने वयाच्या ५७ वर्षात पदार्पण केले आहे. तिचा वाढदिवस साजरा करत असताना, तिचे चाहते तिच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
(4 / 10)
माधुरी ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची जादू ही आजही कायम आहे. हम आपके है कौन, तेजाब, राम लखन, त्रिदेव, परिंदा, दिल, साजन या सारखे अनेक चित्रपट तिच्या अभिनयाने हीट ठरले आहेत.
(5 / 10)
तिच्या संपूर्ण कारकिर्दीत, तिने सलमान खान सारख्या स्टार्ससोबत अभिनय करताना स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.
(6 / 10)
अनिल कपूर आणि संजय दत्त सोबत तिने अनेक चित्रपट केले. तिचे आणि संजय दत्तचे लव्ह अफेअरच्या अनेक चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. दोघे लग्न करतील अशी देखील चर्चा होती.
(7 / 10)
जेव्हा माधुरीने चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा तिच्या अनेक चाहत्यांचे हृदय तुटले होते.
(8 / 10)
तेजाब मध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. उत्साही आणि बंडखोर मोहिनी म्हणून तिच्या अभिनय आणि "एक दो तीन" या गाण्यावरील नृत्याने आजही अनेकांना वेड लावले आहे.
(9 / 10)
तिने द फेम गेम या वेब सीरिजमध्ये देखील भूमिका साकारली असून यातही तिने केलेल्या कामाचे अभिनय क्षेत्रात कौतुक झाले आहे.
(10 / 10)
माधुरी एक रुपेरी पडद्यावरील राणी आहे आणि त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. आज देखील तिच्या नव्या चित्रपटांची तिचे चाहते हे आतुरतेने वाट पाहत आहेत.