Madhurani Gokhale Prabhulkar: नुकतेच मधुराणी प्रभुलकर-गोखले हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
(1 / 4)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘अरुंधती’ बनवून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मधुराणी नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. ‘अरुंधती’च्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून जोरदार लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.
(2 / 4)
मधुराणी प्रभुलकर हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. नुकतेच मधुराणी प्रभुलकर-गोखले हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
(3 / 4)
या फोटोमध्ये मधुराणी हिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून, कपाळावर टिकली लावताना आपल्या सुंदर अदा कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.
(4 / 4)
मोकळे केस कपाळावर टिकली, कानात मोत्याच्या कुड्या, हातात कडा, गळ्यात स्टेटमेंट नेकलेस या पारंपारिक पण मॉडर्न अशा अवतारात अरुंधती अर्थात मधुराणी खूपच सुंदर दिसत आहे.
(5 / 4)
मधुराणी प्रभुलकरच्या या फोटोवर नेटकरी देखील भाळले आहेत. चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट करत आणि कवितेच्या ओळी लिहीत मधुराणीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.