मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lust in Astrology: 'या' राशींमध्ये असते अधिक वासनेची भावना! पाहा तुमची रास ‘कामुक’ गटात आहे का?

Lust in Astrology: 'या' राशींमध्ये असते अधिक वासनेची भावना! पाहा तुमची रास ‘कामुक’ गटात आहे का?

May 22, 2024 11:28 AM IST
  • twitter
  • twitter
Lust in Astrology: ज्योतिषशास्त्राच्या नियमांनुसार १२ राशींची चार गटांत विभागल्या जातात. यातील तीन राशींची विभागणी अधिक वासनेची भावना असणाऱ्या राशींमध्ये केली जाते. जाणून घ्या…
वासना या शब्दाचा अर्थ आहे इच्छा! वासना म्हणजेच इच्छा ही केवळ एकाच बाबतीत नाही तर, सगळ्याच बाबतीत अधिकची अपेक्षा असणाऱ्या पुरुष किंवा स्त्री यांना अधिक वासना असणाऱ्या गटात विभागले गेले आहे. अशी लोक मुख्यत: ‘या’ तीन राशींची असतात.
share
(1 / 8)

ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत तीन राशींची विभागणी सर्वात कामुक राशींमध्ये केली जाते. हे लग्नाच्या नात्यातही लागू पडते.
share
(2 / 8)

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या कुंडलीत राशी शरीर आहे आणि तर लग्न हे जीवन आहे. ज्योतिषींच्या मते, व्यक्तीच्या लग्नामुळेच त्याच्या विचारलहरी निर्माण होतात.
share
(3 / 8)

ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी चार वेगवेगळ्या राशींमध्ये विभागल्या जातात: धर्म राशी, कर्म राशी, काम राशी आणि मोक्ष राशी. ही विभागणी सदाचार, धन, सुख आणि घर या तत्त्वज्ञानावर आधारित आहेत.
share
(4 / 8)

मेष, सिंह आणि धनु या धर्मराशी मानल्या जातात. त्यांच्याकडे नैतिक विचार असतात. गरजूंना मदत करणे आणि संघर्षशील नात्यांना मदत करून या राशीच्या लोकांना समाधान मिळते.
share
(5 / 8)

कर्म या शब्दाचा अर्थ काम असा होतो. वृषभ, कन्या आणि मकर राशीचे कर्मराशी म्हणून वर्गीकरण केले जाते. या राशीचे लोक आपल्या कामावर खूप लक्ष केंद्रित करतात.
share
(6 / 8)

मिथुन, तूळ आणि कुंभ राशीचे कामुक राशी म्हणून वर्गीकरण केले जाते. त्यांच्यात कामवासनेचे पुष्कळ गुण असतात. इथे लैंगिक गुणांचा अर्थ केवळ स्त्री-पुरुष मोह असा घेऊ नये.  चांगले कपडे घालणे, चांगल्या अन्न पदार्थांची चव घेणे, प्रवास करणे आणि चांगला वेळ घालवणे यासारख्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंददायक क्रियाकलापांमध्ये त्यांना अधिक रस असतो. त्यांचा जन्म आनंद भोगण्यासाठीच होतो. 
share
(7 / 8)

कर्क, वृश्चिक आणि मीन राशीचे मोक्ष राशी म्हणून वर्गीकरण केले जाते. त्यांना ध्यान आणि देवभक्तीमध्ये जास्त रस असतो. त्यांची कोणतीही परीक्षा असली, तरी ते देवावर ओझे टाकून पुढच्या कामाला निघतात. 
share
(8 / 8)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज