(1 / 5)भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ते आहेत, असे म्हटले जाते. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित वार आहे. असे मानले जाते की, या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्यात, भगवान विष्णूला समर्पित दोन एकादशी व्रत देखील पाळले जातात. यातील एक कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात येते.