LSG vs CSK IPL 2023 : गेल्या तासाभरापासून होत असलेल्या पावसामुळं पंचांनी सीएसके आणि लखनौतील सामना रद्द करण्याची घोषणा केली आहे.
(1 / 6)
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match IPL 2023 : चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना मुसळधार पावसामुळं रद्द करण्यात आला आहे.(AFP)
(2 / 6)
मॅच सुरू होण्यापूर्वीच लखनौत पावसाची सुरुवात झाली होती. रिमझिम पावसामुळं टॉसला अर्धा तास उशीर झाला होता.(PTI)
(3 / 6)
सामना सुरू झाल्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी लखनौचे सात फलंदाज बाद करत सामन्यावर पकड मिळवली. लखनौच्या आयुष बदोनीने विस्फोटक खेळी करत संघाला १२५ धावांचा सन्मानजनक स्कोर उभारून दिला. परंतु डावाचे दोन चेंडू बाकी असताना सामना थांबवण्यात आला.(PTI)
(4 / 6)
महेंद्रसिंह धोनीची बॅटिंग पाहण्यासाठी आलेल्या लखनौकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. पावसाची सुरुवात होताच असंख्य चाहते स्टेडियम सोडून निघून गेले.(PTI)
(5 / 6)
पावसामुळं खेळ थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू होईल, असं अनेकांना वाटत होतं, परंतु तसं झालं नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पावसामुळं सामना रद्द करावा लागला आहे.(PTI)
(6 / 6)
सामना रद्द झाल्यानंतर आता सीएसके आणि लखनौ या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार आहे. त्यामुळं आता सामना रद्द झाला असला तरी दोन्ही संघांचं फार नुकसान झालेलं नाही. परंतु चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.(AP)