तिबेटमध्ये लोसारला सणाला सांस्कृतिक महत्त्व आहे. तिबेटी नवीन वर्षाचे हा सण प्रतीक आहे. तिबेटी बौद्ध आणि तिबेटी कॅलेंडर या उत्सवापासून पाळले जातात. भारतातील सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात तसेच जगभरातील तिबेटी समुदायांमध्ये हा सण उत्साहाने साजरा केला जातो.
(HT Photo/Shyam sharma)हा उत्सव अमावस्येच्या दिवशी सुरू होतो, जो तिबेटी कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याची सुरवात सूचित करते. तिबेटमध्ये, हा सण "ग्याल्पो लोसार" म्हणून ओळखला जातो. याचा अर्थ, "राजाचे नवीन वर्ष" असा होतो.
(AFP)लोसार हा मेजवानीचा आणि सामाजिक जणीवेचा सण आहे. या सणात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार एकत्र जेवण आणि पेयांचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.
(REUTERS)या उत्सवादरम्यान, व्यक्ती देवतांपुढे प्रार्थना करून पुढील वर्ष शांततेत जणाऱ्यासाठी प्रार्थना करतात.
(Shutterstock)चिकन थुकपा हा लोसारशी संबंधित तिबेटी खाद्यपदार्थ आहे. याला गुथुक देखील म्हटले जाते. हा पदार्थ नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तयार केला जातो. हा सूप आणि नूडल सारखा दिसणारा पदार्थ पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ नूडल अनाई सूप सारखा दिसतो. हा पदार्थ तिबेटी जेवण, थुक्पा भातुकचा एक प्रकार आहे.
(File Photo)लोसारच्या संध्याकाळी, भाविक मेथो नावाच्या शोभा यात्रेत सहभागघेतात. यात अग्नी मशाली घेऊन घोषणा दिल्या जातात. नागरिक रस्त्यावर आणि बाजारपेठांमधून मिरवणुक काढतात.
(HT Photo/Shyam Sharma)सिक्कीममध्ये, लोसार उत्सव कापणीच्या हंगामाची समाप्ती आणि तिबेटी कॅलेंडरमध्ये दहाव्या महिन्याच्या आगमनाचे प्रतीक आहे.
(REUTERS)अरुणाचल प्रदेशातील मोनपा जमाती तीन दिवसांच्या कालावधीत तवांगमध्ये लोसार उत्सव साजरा केला जातो.
(REUTERS)