(2 / 8)Delhi Lok Sabha Elections 2024: दिल्लीत एकूण १ कोटी ४७ लाख १८,११९ मतदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये भाजप, आप आणि कॉंग्रेसदरम्यान तिरंगी लढत झाली होती. त्यात सर्व सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी 'आप' हा ‘इंडिया’ आघाडीचा घटक आहे. त्यामुळे दिल्लीत सातपैकी चार जागा ‘आप’ तर तीन जागा कॉंग्रेस लढवत आहे. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली असून ते कारागृहात आहेत. ‘आप’ने केजरीवालांच्या अटकेचा मुद्दा प्रचारात आणला आहे. केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. 'आप'कडून दिल्ली सरकारने शिक्षण, आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख केला जात आहे. दुसरीकडे भाजपने केजरावील सरकारमधील कथित 'भ्रष्टाचार'चा मुद्दा उचलून धरला आहे. कलम ३७० हटवणे, सीएए लागू करणे आणि राम मंदिराची उभारणी यासारख्या विषयांवर भाजप मते मागत आहे. दिल्लीत पाणीपुरवठा, गटार आणि अनधिकृत वसाहतींमधील पायाभूत सुविधांची खराब स्थिती हाही येथील प्रचाराचा मुद्दा आहे.