मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lok Sabha Elections 2024 : सचिन-अर्जुन ते अजिंक्य रहाणे… क्रिकेटपटूंनी मुंबईत केलं मतदान, फोटो पाहा

Lok Sabha Elections 2024 : सचिन-अर्जुन ते अजिंक्य रहाणे… क्रिकेटपटूंनी मुंबईत केलं मतदान, फोटो पाहा

May 20, 2024 03:11 PM IST
  • twitter
  • twitter
  • लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान आज (२० मे) होत आहे. यात महाराष्ट्रातील १३ जागांचा समावेश आहे. आज मुंबईत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटूंनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान आज (२० मे) होत आहे. पाचव्या टप्प्यात ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान होत आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील १३ जागांचा समावेश आहे. आज मुंबईत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटूंनी मतदानाचा हक्क बजावला.
share
(1 / 6)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत मुंबईतील एका मतदान केंद्रावर दिसला. शहरातील वांद्रे पश्चिम परिसरात तेंडुलकरचे घर आहे. मतदान केल्यानंतर
share
(2 / 6)

मतदान करून केंद्राबाहेर आल्यानंतर सचिन म्हणाला, "मी ECI चा राष्ट्रीय आयकॉन आहे आणि तुमचे मत देण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होतो. मी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो कारण ते देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
share
(3 / 6)

दक्षिण मुंबईतील वरळी येथील रहिवासी असलेल्या सुनील गावस्कर यांनीही आज मतदान केले. मतदान केल्यानंतर गावस्कर म्हणाले,  “ ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्या प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. कारण त्यांच्यासठी सरकार बनणार आहे आणि त्यांच्या मताला महत्त्व आहे."
share
(4 / 6)

मुंबईचा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव यानेही सकाळी मतदान केले. 
share
(5 / 6)

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर रहाणेने पत्नीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मतदान केल्यानंतर रहाणेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करून मतदान करण्याचे आवाहन केले.   
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज