(1 / 5)नावः संजना जाटव; वय २५; मतदारसंघ: भरतपूर (राजस्थान) कॉंग्रेस पक्षाची खासदार संजना जाटव ही लोकसभेवर निवडून आलेली सर्वात तरुण खासदार आहे. संजनाने लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भाजपचे माजी खासदार रामस्वरुप कोळी यांचा ५१ हजार ९८३ मतांनी पराभव केला आहे. संजना ही मूळ अलवर जिल्ह्यात असलेल्या कठूमर तालुक्यातील हसील या गावची रहिवासी आहे. संजनाचा पती कप्तान सिंह हा अलवरच्या खेडलीचा रहिवासी असून तो राजस्थान पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. संजना जाटव हिने एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ती यापूर्वी अलवर जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून निवडून आली होती. संजना ही कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जवळची तरुण नेता मानली जाते. संजना ही प्रियंका गांधी यांनी सुरू केलेल्या 'लडकी हूं, लड सकती हूं' या अभियानात सक्रीय आहे.