लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये आज सकाळी ७ मतदानाला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी सकाळपासून मतदारांचा उत्साह होता.
(PTI)उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील कांचनपूर गावात, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान करण्यासाठी मतदार वाट पाहत रांगेत उभे असतांना.
(PTI)अजमेरमध्ये, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर एक वृद्ध महिला तिच्या बोटावरील शाई दाखवत असतांना.
(PTI)मोरीगाव जिल्ह्यातील मायोंग येथे एक वृद्ध जोडपे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान करण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा केला असल्याची प्रतिक्रिया दिली.

(PTI)पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नागरिकांना विक्रमी संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
(PTI)सुरळीत आणि सर्वसमावेशक मतदानाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना राबवल्या. तसेच गैर प्रकार टाळण्यासाठी अनेक ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
(PTI)