मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

May 17, 2024 08:42 PM IST
  • twitter
  • twitter
Mumbai Lok Sabha constituency: मुंबई शहरांतर्गत येणाऱ्या सहा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशा थेट लढत होत आहेत. या लढतींचं संपूर्ण चित्र वाचा.
Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतय. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. विद्यमान खासदार, शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
share
(1 / 6)

Mumbai (South-Central) Lok Sabha Constituency: मुंबई (दक्षिण-मध्य) लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार, शिवसेना (शिंदे गटाचे) राहुल शेवाळे आणि शिवसेना (ठाकरे गट) अनिल देसाई यांच्यात लढत आहे. गेल्या काही वर्षांत तब्बल आठ वेळा शिवसेनेने या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात वडाळा, माहिम, सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणूशक्ती नगरचा भाग येतो. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेले शिवसेना भवन याच मतदारसंघात आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्षाच्या दोन गटात येथे थेट लढत होत असल्याने सामना अटीतटीचा आहे.
share
(2 / 6)

Mumbai (North-Central) Lok Sabha Constituency :  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना बदलून माजी सरकारी वकील उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. निकम यांचा मुकाबला मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षा, धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यासोबत आहे. या मतदारसंघात सुनील दत्त यांच्या काळापासून कॉंग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलेलं आहे. बहुभाषिक समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे -पूर्व आणि पश्चिम तसेच कलिना विधानसभा मतदारसंघात मराठी, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेलं ‘मातोश्री’ हे निवासस्थान याच मतदारसंघात येतं. त्यामुळे कॉंग्रेस उमेदवाराला शिवसेना ठाकरे गटाची मोठा पाठिंबा अपेक्षित आहे.
share
(3 / 6)

Mumbai (North-West Lok Sabha Constituency: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात थेट लढत होत असून शिवसेना (ठाकरे गटाच्या) अमोल कीर्तीकरांचा सामना थेट शिवसेना (शिंंदे गटाचे) रवींद्र वायकर यांंच्यासोबत आहे. अमोल कीर्तीकर यांचे वडील, या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तत्पूर्वी ते चार वेळा नगरसेवक होते. अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोवा, गोरेगाव आणि दिंडोशीचा भाग या लोकसभा मतदारसंघात येतो. येथे मराठी मतदारांसोबतच दक्षिण भारतीय, गुजराती आणि बंगाली मतदारांची मोठी संख्या आहे. 
share
(4 / 6)

Mumbai (North-East) Lok Sabha Constituency: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांना डावलून मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) गटाकडून संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत. पाटील हे यापूर्वी २००४ साली आमदार आणि २००९ साली या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे. माजी आमदार, ज्येष्ठ कामगार नेते दिना बामा पाटील यांचे मोठे काम या मतदारसंघात आहे. त्याचा फायदा संजय पाटील यांना होऊ शकतो.
share
(5 / 6)

Mumbai (North) Lok Sabha constituency: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतला भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हे येथून पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. गोपाळ शेट्टी दोन वेळा सलग निवडून गेले होते. भाजपने यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर कॉंग्रेस पक्षाने स्थानिक भूमिपुत्र असलेल्या भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अभिनेता गोविंदा याने २००४ साली या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. या मतदारसंघात अनेक समस्या असल्या तरी भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा यंदा सामना रंगला आहे.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज