भारतीय जनता पार्टी (भाजप) बालूरघाटमधील उमेदवार, सुकांता मजुमदार, पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमधील बालूरघाटजवळ, निवडणूक प्रचारादरम्यान क्रिकेट खेळून प्रचार करत असतांना.
(ANI)कर्नाटकातील शिवमोग्गा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार के.एस. ईश्वरप्पा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅली काढून शक्ति प्रदर्शन केले. मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी विविधी योजना देखील घोषित केल्या जात आहेत.
(PTI)हुगळी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी पश्चिम बंगालच्या हुगळी येथे निवडणूक प्रचारादरम्यान भाजी खरेदी खेरेदी करत असतांना.
(PTI)बाईक स्वार राजलक्ष्मी मंदा, ज्याला बुलेट राणी म्हणूनही ओळखले जाते, उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढून निवडणूक प्रचारादरम्यान नगरिकांसोबत फोटो काढत असतांना टिपलेले हे छायाचित्र.
(PTI)पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात पक्षाचे उमेदवार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांच्या समर्थनार्थ निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित केले.
(PTI)पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील दौसा येथील भाजप उमेदवार कन्हिया लाल मीना यांच्या समर्थनार्थ रोड शो दरम्यान राजस्थानचे मंत्री किरोडी लाल मीणा यांच्यासोबत.
(PTI)हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान अभिनेते आणि भाजप उमेदवार कंगना रणावत सोबत.
(PTI)तमिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील विरुधुनगर मतदारसंघातील DMK उमेदवार विजया प्रभाकरन यांच्या समर्थनार्थ प्रचार करताना तिरुमंगलम येथे रोड शो दरम्यान AIADMK उपाध्यक्ष आरबी उदयकुमार.
(PTI)