Lockie Ferguson Wedding : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन विवाह बंधनात अडकला आहे. लॉकी फर्ग्युसन याने त्याची मैत्रीण एम्मा कोमोकीशी लग्न केले. त्याचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
(1 / 7)
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने गुरुवारी (२ फेब्रुवारी) लग्न केले. फर्ग्युसन आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळला आहे. तो सध्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे.
(2 / 7)
फर्ग्युसनने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
(3 / 7)
फर्ग्युसनला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने यंदाच्या आयपीएल २०२४ साठी आपला भाग बनवले आहे. आयपीएल २०२४ साठी झालेल्या मिनी लिलावात किवी वेगवान गोलंदाजाला आरसीबीने २ कोटी रुपयांना विकत घेतले.
(4 / 7)
फर्ग्युसनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "मिसेस फर्ग्युसनची ओळख करून देत आहे." पुढे त्याने लग्नाची तारीख लिहिली.
(5 / 7)
लग्नाच्या फोटोंमध्ये फर्ग्युसन ब्लॅक अँड व्हाइट सूटमध्ये दिसत आहे. या पोस्टवर कमेंट करताना किवी खेळाडू जिमी नीशमने त्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
(6 / 7)
फर्ग्युसनच्या पत्नीचे नाव एम्मा कोमोकी आहे. एम्मा आणि लॉकी फर्ग्युसन खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
(7 / 7)
फर्ग्युसन न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. आतापर्यंत त्याने १ कसोटी, ६५ एकदिवसीय आणि ३६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.(all photos- Lockie Ferguson instagram)