Liver Care Tips: आपल्या यकृताची काळजी घेण्यासाठी काय करावे हे तुम्हाला माहीत आहे का? येथे जाणून घ्या.
(1 / 6)
लिव्हरची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी अनेक नियम पाळले पाहिजेत. तुमचे यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया.(Freepik)
(2 / 6)
गोड पदार्थ खाणे यकृतासाठी चांगले नसते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी जास्त मिठाई खाणे शक्यतो टाळा.(Freepik)
(3 / 6)
जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने सुद्धा यकृताचे गंभीर नुकसान होते.(Freepik)
(4 / 6)
रेड मीट खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. इतकेच नाही तर यकृताच्या इतर आजारांनाही रेड मीट कारणीभूत आहे. त्यामुळे यकृत निरोगी ठेवण्यासाठी रेड मीट खाऊ नये.(Freepik)
(5 / 6)
रक्तातील साखरेमुळे किंवा आहारामुळे बरेच लोक आर्टिफिशियल स्वीटनर वापरतात. अशा साखरमुक्त पदार्थांमुळे यकृताचे आजार होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळा.(Freepik)
(6 / 6)
याशिवाय दारू पिणे टाळावे. मद्यपान केल्याने लिव्हर सिरोसिस आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी दारू पिऊ नका.(Freepik)