मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lionel Messi Birthday : फुटबॉलचा जादूगार, ८०० हून अधिक गोल, अर्जेंटिनाला सुवर्ण क्षण देणारा कर्णधार

Lionel Messi Birthday : फुटबॉलचा जादूगार, ८०० हून अधिक गोल, अर्जेंटिनाला सुवर्ण क्षण देणारा कर्णधार

Jun 24, 2024 01:12 PM IST
  • twitter
  • twitter
अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मेस्सीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एखाद्या खेळाडूला जे हवे तसे सर्व काही साध्य केले आहे.
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत ८०० हून अधिक गोल केले आहेत, ७ वेळा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे आणि ६ युरोपियन गोल्डन शू पुरस्कारांसह अनेक उत्कृष्ट टप्पे गाठले आहेत.
share
(1 / 7)
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत ८०० हून अधिक गोल केले आहेत, ७ वेळा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे आणि ६ युरोपियन गोल्डन शू पुरस्कारांसह अनेक उत्कृष्ट टप्पे गाठले आहेत.(AFP)
मेस्सी लहानपणी आजाराने त्रस्त होता - फुटबॉलपटू होणे मेस्सीसाठी इतके सोपे नव्हते. आपल्या जादूने जगावर राज्य करणारा मेस्सी जेव्हा ११ वर्षांचा होता, तेव्हा त्याला ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेच्या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे बालकाचा शारीरिक विकास थांबतो. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी मेस्सीला दररोज इंजेक्शन दिले जायचे.
share
(2 / 7)
मेस्सी लहानपणी आजाराने त्रस्त होता - फुटबॉलपटू होणे मेस्सीसाठी इतके सोपे नव्हते. आपल्या जादूने जगावर राज्य करणारा मेस्सी जेव्हा ११ वर्षांचा होता, तेव्हा त्याला ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेच्या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे बालकाचा शारीरिक विकास थांबतो. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी मेस्सीला दररोज इंजेक्शन दिले जायचे.(AFP)
वयाच्या १३ व्या वर्षी बार्सिलोनामध्ये-  वयाच्या १३ व्या वर्षी मेस्सी स्पेनला आला आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला. मेस्सीने नॅपकिनवर बार्सिलोनाचा करार केला होता.  
share
(3 / 7)
वयाच्या १३ व्या वर्षी बार्सिलोनामध्ये-  वयाच्या १३ व्या वर्षी मेस्सी स्पेनला आला आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये सामील झाला. मेस्सीने नॅपकिनवर बार्सिलोनाचा करार केला होता.  (AP)
२००० मध्ये, बार्सिलोना प्रतिभावान खेळाडूंच्या शोधात होते आणि त्यामुळे त्यांनी 'टॅलेंट हंड प्रोग्राम' सुरू केला. मेस्सीच्या वडिलांना बार्सिलोनातील या कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि त्यांनी क्लबशी संपर्क साधला. मात्र, क्लबने मेस्सीसमोर एक अट ठेवली होती की, तो स्पेनमध्ये येऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह वास्तव्य करेल, तरच त्याला बार्सिलोनामध्ये स्थान मिळेल.
share
(4 / 7)

मेस्सीची जादू जगाने पाहिली - बार्सिलोनामध्ये सामील झाल्यानंतर मेस्सीने मागे वळून पाहिले नाही. मेस्सीची कामगिरी वर्षानुवर्षे चांगली होत गेली. क्लबकडून खेळताना, मेस्सीने १० ला लीगा आणि ४ UEFA चॅम्पियन्स जेतेपद पटकावले. यासोबतच त्याने बार्सिलोनाला ८ वेळा स्पॅनिश सुपर कपचा चॅम्पियन बनवले. मेस्सीच्या नेतृत्वाखाली बार्सिलोनाने ७ वेळा कोपा डेल रे जेतेपदावरही कब्जा केला.
share
(5 / 7)

करिअरमध्ये ८०० हून अधिक गोल - लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ८०० हून अधिक गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूने एका क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही केला आहे. ला लीगा आणि युरोपियन लीग हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही मेस्सीच्या नावावर आहे. यासह मेस्सीने या लीगमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक गोलही केले आहेत.
share
(6 / 7)

अर्जेंटिनाचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला- लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२२ मध्ये खेळला जाणारा फिफा विश्वचषक जिंकला. मेस्सीने ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले. फ्रान्सविरुद्धच्या जेतेपदाच्या लढतीत मेस्सीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये दमदार गोल नोंदवून त्याने संपूर्ण अर्जेंटिनाला विजय साजरा करण्याचा सुवर्ण क्षण दिला.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज