दीपिका पदुकोणने प्रेग्नेंसी फोटोशूटचे सुंदर फोटो शेअर करत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्रीने या मॅटर्निटी शूटमध्ये आपला बेबी बंप दाखवला आहे. पण, एखाद्या सेलिब्रिटीने आपल्या मॅटर्निटी शूटने चाहत्यांना भुरळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. करीना कपूर, रिहाना आणि रिचा चड्ढा यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी प्रेग्नेंसी फोटोशूटदरम्यान बेबी बंप दाखवला होता.
(Instagram)दीपिकाच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमध्ये सोलो शॉट्स आणि काही फोटो आहेत, ज्यात रणवीरने तिच्या बेबी बंपला मिठी मारल्याचे दिसत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये दोघांनी चार वेगवेगळे आउटफिट परिधान केले होते. यात तिने सब्यसाचीचा फ्लोरल एम्ब्रॉयडरी केलेला ब्लॅक ड्रेस, ब्रालेट-जीन्स-कार्डिगन कॉम्बो, ब्लॅक फुल बॉडी लेंथ ड्रेस आणि पॅन्ट आणि लेस ब्रा टॉपसह ब्लेझर परिधान केला होता.
(Instagram)करीना कपूरने ब्लॅक अँड व्हाईट प्रेग्नेंसी फोटोशूट केले होते. करीनाचे हे फोटो रोहन श्रेष्ठाने क्लिक केले होते, तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले होते की, तैमूरला जन्म देण्याच्या एक आठवडा आधी करीनाने हे फोटो क्लिक केले होते. बेबी बंप दाखवताना तिने स्पोर्ट्स ब्रा, ट्रॅक पँट आणि बटन डाऊन शर्ट परिधान केला होता.
(Instagram)या मॅटर्निटी शूटमध्ये अनुष्का शर्मा खूपच सुंदर दिसत होती. व्होग मॅगझिनच्या कव्हर शूटसाठी काढलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिचा बेबी बंप दाखवला होता. पहिल्या फोटोत तिने पांढरा शर्ट आणि ब्लॅक बूटी शॉर्ट्स परिधान केले होते, तर, दुसऱ्या फोटोत तिने ट्रेंच कोट, बिकिनी टॉप आणि लिनन पँट परिधान केली होती.
(Instagram)रिहानानेही व्होग कव्हर शूटसाठी बेबी बंप दाखवला होता. फोटोशूटसाठी तिने आकर्षक आउटफिट्स परिधान केले होते, ज्यात ज्वेलरीमध्ये तिने बेली चेन आणि बिकिनी बॉटमसह स्टाईल केलेले दोन जबरदस्त जॅकेट्स परिधान केले होते. दुसऱ्या एका फोटोत तिने केशरी रंगाचा क्रोशे स्कर्ट आणि मॅचिंग क्रॉप जॅकेट परिधान केले होते.
(Instagram)नुकतेच पती अली फजलसोबत आपल्या मुलीचे स्वागत करणाऱ्या ऋचा चड्ढाने ब्लॅक अँड व्हाईट प्रेग्नेंसी फोटोशूट केले. या फोटोंसाठी तिने बेबी बंप दाखवण्यासाठी पोटाभोवतीची बटणे उघडी ठेवून बटन डाऊन ड्रेस परिधान केला होता.
(Instagram)लिसा हेडनने एका मॅगझिनच्या कव्हर फोटोशूटसाठी हे फोटो शूट केले होते. अप्रतिम सूर्यास्त आणि त्या पार्श्वभूमीवर समुद्र अशा सुंदर वातावरणात लिसाने काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये बेबी बंप दाखवला होता.
(Instagram)समीरा रेड्डीने आपल्या दुसऱ्या बाळाच्या वेळी गरोदर असताना एक अनोखे मॅटर्निटी शूट केले होते. या अंडरवॉटर फोटोशूटमध्ये समीराने बिकिनी परिधान केली होती आणि तिचा बेबी बंप दाखवला होता. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर केले होते.
(Instagram)अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेने नुकतेच पती आयव्हरसोबत आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. मॅटर्निटी फोटोशूटसाठी अलानाने क्रोशे एम्ब्रॉयडरी पेस्टल पिंक आणि लॅव्हेंडर ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवला होता. तिने अॅटॅच्ड स्लीव्ह्ससह स्ट्रॅपलेस बॅन्डो टॉप परिधान केला होता. साइड कट-आऊटसह मॅचिंग स्कर्टने अलानाचा ग्लोइंग लूक आणखी खुलून आला.
(Instagram)'वायू'च्या वेळी गरोदर असताना सोनम कपूरने केलेले प्रेग्नेंसी फोटोशूट खूपच भन्नाट होते. अबू जानी-संदीप खोसला आयव्हरी ब्लाउज आणि स्कर्ट सेट परिधान केलेल्या सोनमने आपला बेबी बंप दाखवला होता.
(Instagram)