दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा 'लायगर' हा चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मोठ्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटासाठी कलाकारांना भरघोस फी मिळाली आहे. पाहूया या चित्रपटासाठी कोणी किती मानधन घेतलं आहे.
यात टॉलिवूड सुपरस्टार विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. रिपोर्टनुसार, विजयने 'लाइगर'साठी 35 कोटी रुपये घेतले आहेत.
'बाहुबली' फेम राम्या कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. राम्याने तिच्या पात्रासाठी एक कोटी रुपये घेतले आहेत.
बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसन या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. माईक टायसनच्या फीचा खुलासा करण्यात आलेला नसून त्याने विजयपेक्षा जास्त शुल्क आकारले असल्याचे सांगितले जात आहे.