बॉलिवूडचं हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांचं फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला गेली अनेक वर्ष एकमेकांनसोबत राहत आहेत. त्यांनी अजून लग्न केलं नसलं तरी त्यांना एरिक नावाचा एक मुलगा देखील आहे. अर्जुन अनेकदा त्याचे आणि त्याच्याकुटुंबाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अर्जुनचे त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होतात. आताही अर्जुन आणि गॅब्रिएलाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत.
(Instagram/gabriellademetriades)दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आणि डिझायनर असलेल्या गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ने या फोटोंमध्ये ब्रॅलेट टॉप आणि स्कर्टमध्ये घातला आहे. तर अर्जुनने काळ्या रंगाचा हायनेक शर्ट घातला आहे. सोबत अर्जुनच्या हातात सिगारेट आहेत. बॉलिवूडचे हॉटेस्ट कपल गॅब्रिएला डेमेट्रिओस आणि अर्जुन रामपाल पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आले आहेत.
(Instagram/gabriellademetriades)या फोटोशूटने अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये गॅब्रिएलाने फुल स्लीव्हज आणि किलर व्हेस्ट लाइन असलेला पांढरा ब्रॅलेट टॉप घातला आहे. त्यासोबत सोन्याचा नेकलेस, बोटांमध्ये अंगठी, पन्ना जडवलेले ब्रेसलेट आणि काळा सनग्लासेस घातला आहे. सोबतच अर्जुननेही काळा सनग्लासेस घातला आहे.
(Instagram/gabriellademetriades)त्या दोघांनीही कॅमेरासाठी सुंदर अशा पोज दिल्या आहेत. गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल यांची स्टायलिंग डिझायनर आणि स्टायलिस्ट डोला बारुह यांनी केली होती.
(Instagram/gabriellademetriades)अर्जुन आणि गॅब्रिएलाचे हे हॉट फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
(Instagram/gabriellademetriades)संबंधित बातम्या



_1649576213533_1649745072970.jpg)