रविवार हा सूर्याला समर्पित वार आहे. इतर दिवशी सूर्यनमस्कार केले नाही तरी रविवारी ते अवश्य करावे असं शास्त्र सांगतं. आज रविवारी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये हे आपण पाहाणार आहोत.
ध्यान: असे म्हटले जाते की जर तुम्ही विशेषत: प्रदोष, पौर्णिमा, अष्टमी या दिवशी ध्यान केले तर तुम्हाला मिळणारे फायदे दुप्पट नाही तर तिप्पट होतील. मात्र रविवारी ध्यान रेल्यास तुम्हाला जन्मोजन्मीचं पुण्य लाभेल इतकी क्षमता रविवारी केल्या जाणाऱ्या ध्यानात आहे असं सांगितलं जातं.
दान: रविवारी सूर्याचं ध्यान केल्यानंतर दान करण्यालाही खूप महत्व आहे. गरजूंना आपल्या क्षमतेनुसार दान करावं. असं केल्यास पूण्य मिळतं असं सांगण्यात आलं आहे.
नवीन औषधे घेऊ नका: रविवारी एखाद्या नव्या इंजक्शनचा कोर्स करू नका किंवा रविवारी नवी औषधं, गोळ्या सुरू करू नका. असं करणं रविवारी अशुभ मानलं गेलं आहे.
लाल रंगाचा पोशाख करा परिधान : रविवार हा सूर्याचा वार आहे. उगवता सूर्य किंवा सूर्यबिंब लालसर रंगाचं दिसतं. त्यामुळे रविवारी लाल रंगाचा पोशाख घालणे अत्यंत शुभ आहे असं सांगितलं गेलं आहे. रविवारच्या दिवशी लाल रंगाची वस्त्र धारण करून तुम्ही ज्या गोष्टीची मनेोकामना कराल ती गोष्ट पूर्ण होईल असं सांगितलं गेलं आहे.