कार्ल पीया समर्थित स्मार्टफोन ब्रँडने नथिंग फोन २ ए प्लस व्हेरियंटची घोषणा केली आहे. नथिंग फोन २ ए प्लस काही अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्स आणि ड्युअल-टोन बॅक पॅनेलसह येतो, जो मीडियाटेक डायमेंसिटी ७३५० प्रो प्रोसेसरवर चालतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना गेमिंग आणि परफॉर्मन्सचा चांगला अनुभव मिळतो .
(Nothing)रियलमी १३ प्रो सीरिज: रियलमीकडून येणारी ही एक नवीन परफॉर्मन्स सेंट्रिक स्मार्टफोन सीरिज आहे. यात रियलमी १३ प्रो आणि रियलमी १३ प्रो प्लस अशी दोन मॉडेल्स आहेत, जी स्नॅपड्रॅगन ७ एस जेन २ 5G चिपसेटद्वारे संचालित असतील. हा स्मार्टफोन अॅडव्हान्सकॅमेरा क्षमता, एआय प्योर बोक, एआय नॅचरल स्किन टोन, एआय अल्ट्रा क्लॅरिटी, एआय ग्रुप फोटो आणि विविध एआय वैशिष्ट्यांसह येतो.
(Realme)मोटोरोला एज ५०: मोटोरोला एज ५० सीरिजमध्ये लॉन्च झालेला हा आणखी एक स्मार्टफोन आहे. यात स्नॅपड्रॅगन ७ जेन १ एसओसी प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोला एज ५० मध्ये वॅगन लेदर बॅक देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला टिकाऊपणासाठी मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेट देखील मिळाले आहे, ज्यामुळे हा एक मौल्यवान मिड-रेंज स्मार्टफोन बनला आहे.
(Motorola)पोको एम ६ प्लस: या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ एई प्रोसेसर आणि ५०३० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. पोको एम ६ प्लसमध्ये १०८ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन, वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी आयपी ५३ रेटिंग देण्यात आले.
(Amazon)ओप्पो के१२ एक्स 5G: हा ओप्पो स्मार्टफोन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर असून ८ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. ओप्पो के१२ एक्स 5G स्मार्टफोनमध्ये ४५ वॅट सुपर वूक चार्जिंग सपोर्टसह ५१०० एमएएच बॅटरी आली असून या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे.
(Flipkart)