(1 / 5)'लक्ष्मी निवास' या मालिकेचा टीझर प्रसारित झाला आणि चर्चा रंगली ती या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन दिग्गज कलाकार दिसण्याची शक्यता असल्याची... आता याच मालिकेचा दुसरा टीझर प्रसारित झाला आहे. यात हर्षदा खानविलकर, तुषार दळवी या कलाकारांवर शिक्कामोर्तब झालं असून, यांच्या सोबतच अजून एक ओळखीचा चेहेरा या मालिकेत दिसतोय, तो म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या पाठक बाई अर्थात 'अक्षया देवधर'.