Lakhat Ek Aamcha Dada: ३० फुटांचा भव्य दिव्य सुर्यादादा! 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचं ग्रँड प्रीमियर पाहिलंत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lakhat Ek Aamcha Dada: ३० फुटांचा भव्य दिव्य सुर्यादादा! 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचं ग्रँड प्रीमियर पाहिलंत का?

Lakhat Ek Aamcha Dada: ३० फुटांचा भव्य दिव्य सुर्यादादा! 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचं ग्रँड प्रीमियर पाहिलंत का?

Lakhat Ek Aamcha Dada: ३० फुटांचा भव्य दिव्य सुर्यादादा! 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचं ग्रँड प्रीमियर पाहिलंत का?

Jul 04, 2024 05:10 PM IST
  • twitter
  • twitter
Lakhat Ek Aamcha Dada: नितीश चव्हाणने ‘सूर्यदादा’च्या भव्य ३० फीट प्रतिमेचं अनावरण त्याच्या लाडक्या बहिणींसोबत केलं आणि या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार अवघे सातारकर झाले.
आईची माया लावणारा, स्वभावाने निरागस, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा 'लाखात एक आमचा दादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मोठ्या दिलाचा राजामाणूस ‘सूर्यादादा’ ८ जुलै २०२४ रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

दादा येतोय म्हटल्यावर सेलेब्रेशन ग्रँड होणारच ना... ढोल-ताश्याच्या गजरात दादाच आगमन झालं. नितीश चव्हाणने ‘सूर्यदादा’च्या भव्य ३० फीट प्रतिमेचं अनावरण त्याच्या लाडक्या बहिणींसोबत केलं आणि या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार अवघे सातारकर झाले. आता या भव्य क्षणांचे तुम्हीही साक्षीदार बनणार आहात. हे खास क्षण ७ जुलैला रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
twitterfacebook
share
(2 / 5)

अशाप्रकारे कोणत्याही मालिकेचं भव्य पूर्वरंग होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. मालिका विश्वात पहिल्यांदाच बहिणींना आईच्या मायेनी वाढवणारा सूर्यादादा येत आहे. बहिणींच्या लग्नाची त्याला चिंता आहे. पण विधीच काही वेगळंच विधान आहे. दादाच लग्न बहिणीचं भविष्य ठरवणार आहे. पण, सूर्याची लव्ह स्टोरी सोपी नाही.
twitterfacebook
share
(3 / 5)

कारण त्याच्या प्रेमाच्यामध्ये जालिंदर आहे. एकीकडे दुष्ट बाप आणि एकीकडे प्रेमळ सूर्यादादा. जालिंदरच्या दमदार भूमिकेत जेष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक दिसणार आहेत . या मालिकेत ते खलनायकाची भूमिका साकारत आहेत. परिस्थितीने कितीही मात केली तरीही दादाला देवाची साथ आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘लागिर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा कमबॅक करत आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

तसेच दिशा परदेशी देखील या मालिकेच्या निमित्ताने मराठी मालिकाविश्वात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण करतेय. या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केलं आहे. तर, किरण दळवी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज