मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आईची माया लावणारा लाखात एक आमचा दादा! ‘लागीर झालं जी’मधील नितिश चव्हानचे पुनरागमन

आईची माया लावणारा लाखात एक आमचा दादा! ‘लागीर झालं जी’मधील नितिश चव्हानचे पुनरागमन

May 11, 2024 02:45 PM IST Aarti Vilas Borade

  • ‘लागीर झालं जी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा नितीश चव्हाण छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लागीर झालं जी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा नितीश चव्हाण नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सूर्यादादा! चार बहिणींचा भाऊ, स्वभावाने भोळसट, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा लाखात एक असा भाऊ. मोठ्या दिलाचा राजामाणुस!
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या.  तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. दुसरी बहिण धनश्री हिला सतत काहीतरी खायला लागतं. अंगाने जाड असल्याने सूर्याला तिच्या लग्नाची काळजी आहे. धनुला इंग्रजी विषयाशी वाकडे आहे. ती इंग्रजी पास होण्याची वाट सूर्याच नाही तर सगळं गाव पाहतंय, सूर्याची तिसरी बहिण राजश्री घरात लहान असूनही घरची काळजी घेणे रखरखाव करणे हिशेब करणे ती एकप्रकारे घरची फायनान्स मिनिस्टर आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

राजश्री शिकलेली नाही पण व्ययहारात चोख आहे. चौथी बहिण भाग्यश्री ही अजूनही शाळेत शिकते. तिला गाणे शिकायचे आहे. अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे. लहानपणीच आई घर सोडुन पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणीना वाढवलं आहे. जेणेकरून उद्या कुणी तोंड वर करून असं बोलायला नको की आईविना वाढलेल्या मुली वाया गेल्या. असं असलं तरी बहिणींचं सूर्यावर प्रचंड प्रेम आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सूर्याची स्वतःसाठी काहीच स्वप्न नाहीत. त्याने त्याचं बालपणीचं प्रेम ही त्याच्या मनातच ठेवलं आहे. तुळजा जिच्यावर सुर्याचं प्रेम आहे. तुळजा मात्र या सगळ्यापासून अजाण आहे. पुढे तुळजा शिकायला म्हणून शहरात गेली आणि घरच्या परिस्थितीमुळे सूर्याने त्याचे स्वप्न उरात कुठेतरी दाबून टाकले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

एक साधा किराणा दुकानदार असून सुद्धा प्रचंड हिशेबी काय असेल सुर्या आणि त्याच्या चार बहिणींची गोड, साधी पण सुंदर गोष्ट ? आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

एक साधा किराणा दुकानदार असून सुद्धा प्रचंड हिशेबी काय असेल सुर्या आणि त्याच्या चार बहिणींची गोड, साधी पण सुंदर गोष्ट ? आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज