'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने नुकताच या शोला अलविदा केला आहे. या शोमधील कुशचे 'गोली' हे पात्र चाहत्यांना खूप आवडले. निर्मात्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कुशच्या आधी इतर अनेक कलाकारांनी या शोला अलविदा केले आहे. आता या शोचा भाग नसलेल्या कलाकारांवर एक नजर टाकूया…
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो सोडणाऱ्यांच्या यादीत आता ‘गोली’ म्हणजेच कुश शाहचे नावही सामील झाले आहे. कुशने शोचा निरोप घेऊन शोमधील इतर कलाकार आणि चाहत्यांना भावूक केले आहे. गोली हा टप्पू सेनाच अविभाज्य भाग होता.
जेव्हा असित मोदींचा शो सुरू झाला, तेव्हा ‘टप्पू’ची भूमिका भव्य गांधी याने साकारली होती. २००८ ते २०१७ या काळात त्याने ही भूमिका साकारली होती. २०१७ ते २०२२पर्यंत भव्यच्या जागी राज अनादकत दिसला होता. त्याच्यानंतर आता नितीश भालुनी ही भूमिका साकारताना दिसत आहेत.
झील मेहताने २००८ ते २०१२ या काळात सोनूची भूमिका साकारली होती. यानंतर निधी भानुशाली या शोमध्ये दिसली, जी २०१२ ते २०१९ या काळात ‘सोनू’च्या भूमिकेत दिसली होती. सध्या पलक सिधवानी या शोमध्ये सोनूची भूमिका साकारत आहे.
शैलेश लोढा शोच्या सुरुवातीपासूनच ‘तारक मेहता’ ही व्यक्तिरेखा साकारत होता. त्याने शो सोडल्यानंतर आता सचिन श्रॉफ या शोमध्ये तारक मेहताच्या भूमिकेत दिसत आहे.
गुरुचरण सिंह अलीकडेच त्याच्या बेपत्ता झाल्याच्या बातम्यांनी चर्चेत आला होता. वडिलांच्या आजारपणामुळे गुरुचरणने शो सोडला होता. त्याच्या जागी आता हे पात्र बलविंदर सिंह साकारत आहे.
मोनिका या शोमध्ये बावरीची भूमिका साकारताना दिसली आहे. या शोमध्ये मोनिकाच्या जागी नवीन वाडेकरची निवड करण्यात आली आहे.
नेहा गेल्या १२ वर्षांपासून या शोचा भाग होती. २०२०मध्ये तिने या शोला निरोप दिला. तिच्या व्यक्तिरेखेला ऑनस्क्रीन खूप प्रेम मिळाले. या शोमध्ये अंजलीची जागा सुनैना फौजदारने घेतली आहे.