बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ती आपल्या लूकने चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे.
नुकतेच क्रिती सेनन हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती सेनॉनची टीम तिला कार्यक्रमासाठी तयार करताना दिसत आहे.
या फोटोमध्ये क्रिती सेननच्या चेहऱ्यावरील चमक पाहून चाहत्यांच्या हृदयाची धकधक वाढली आहे. क्रितीचे फोटो पाहून सगळेच घायाळ झाले आहेत.
क्रिती सेननच्या लूकबद्दल बोलायचे तर, तर ती गुलाबी मिनी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या ड्रेसवर मोठे काळे पोल्का डॉट्स आहेत.
अभिनेत्री क्रिती सेननने हे फोटो शेअर करताना त्यांना ‘विंटेज’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
क्रिती सेननच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते सुंदर, खूप हॉट, जबरदस्त, बॉलिवूड क्वीन, गॉर्जियस अशा कमेंट करताना दिसत आहे.