बॉलिवूड अभिनेत्री या कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी त्यांच्या कपड्यांमुळे तर कधी महागड्या वस्तूंमुळे. तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांची उंची अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे. या यादीमध्ये एक दोन नाही तर अनेक अभिनेत्री आहेत. चला पाहूया या यादीमध्ये असणाऱ्या अभिनेत्री आणि त्यांच्या उंची…
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये क्रिती सेनॉनचे नाव घेतले जाते. तिने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सुंदर अभिनेत्रीची उंची ५ फूट १० इंच आहे. क्रिती सध्याची बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री मानली जाते.
अभिनेत्री सुष्मिता सेनने एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. सुष्मिताची उंची ही ५ फूट ९ इंच आहे. तिच्या उंचीची अनेकदा चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री दीपिका पादूकोणने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिच्या उंचीची चर्चा रंगली होती. सुष्मिता आणि क्रिती प्रमाणेच दीपिकाची उंची ही ५ फूट ९ इंच आहे. ती देखील उंच अभिनेत्रींच्या यादीमध्ये सहभागी आहे.
क्रिकेटपटू विराट कोहलची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील उंच अभिनेत्रींच्या यादीमध्ये येते. अनुष्काची उंची ही ५ फूट ९ इंच आहे.