मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kokila Vrat 2024 : मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी करा हे व्रत, वाचा कोकीळा व्रताची पूजा पद्धत आणि महत्व

Kokila Vrat 2024 : मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी करा हे व्रत, वाचा कोकीळा व्रताची पूजा पद्धत आणि महत्व

Jul 10, 2024 02:29 PM IST
  • twitter
  • twitter
Kokila Vrat 2024 : कोकिळा व्रताचे पालन केल्याने विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखी होते. दुसरीकडे, अविवाहित मुलींनी हे व्रत केल्यास भगवान शिवासारखा योग्य वर मिळतो अशी मान्यता आहे. वाचा कोकिळा व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व.
दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला कोकिळा व्रत केले जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, या व्रताचा परिणाम अखंड सौभाग्य प्राप्त करणे आहे. त्याचबरोबर अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचा वर मिळतो अशी मान्यता आहे.
share
(1 / 11)

सुख-समृद्धीसाठी कोकिळा व्रत व्रत करावे. चला तर मग जाणून घेऊया यंदा कोकिळा व्रत कधी आहे. तसेच या व्रताची पूजा पद्धत आणि महत्त्व काय आहे.
share
(2 / 11)

कोकिळा व्रत केव्हा केले जाईल : वैदिक दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा २० जुलै रोजी सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल . प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली जाते. २० जुलै रोजी कोकिळा व्रत केले जाणार आहे.  
share
(3 / 11)

कोकिला व्रताचा संकल्प २० जुलै रोजी सकाळी ५: ३६ ते ६:२१ या वेळेत घेता येईल.  
share
(4 / 11)
कोकिला व्रताचा संकल्प २० जुलै रोजी सकाळी ५: ३६ ते ६:२१ या वेळेत घेता येईल.  
कोकिळा उपवास पूजा पद्धत : आषाढ पौर्णिमेच्या दिवशी कोकीळा व्रताचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्म मुहूर्तावर उठले पाहिजे. सर्वप्रथम स्नान करून भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करावे.
share
(5 / 11)

पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा आणि हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा संकल्प करा. हे व्रत १८ वर्षानी एकदा येते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी ३ दिवस, कुणी १ दिवस करतात.
share
(6 / 11)

एका भांड्यात पाणी घेऊन ब्रह्म मुहूर्तावर सूर्यदेवाला अर्पण करा. या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा देखील केली जाते. पूजा करण्याबरोबरच कोकिळा व्रत देखील पाळले जाते. 
share
(7 / 11)

त्यानंतर पूजागृहात लाल कापड पसरवून शिवकुटुंबाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.  पंचोपचारानंतर शिवासह देवी पार्वतीची पूजा करावी.
share
(8 / 11)

नंतर बेलपत्र, भांग, धूत्र, पांढरी फुले, फळे इत्यादी अर्पण करा. धार्मिक ग्रंथानुसार देव सतीला कोकिळेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की देवी सतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कोकिळा व्रत पाळले. या व्रतामुळे मनानुसार शुभ फळ प्राप्त होते. 
share
(9 / 11)

पूजेदरम्यान शिव चालीसा आणि शिव मंत्राचा जप करावा. यानंतर तुपाचा दिवा लावून दिवसभर उपवास करावा. सूर्यास्तानंतर पूजा करा आणि नंतर फळ घ्या. या व्रतामध्ये अन्न घेतले जात नाही. दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतरच अन्न घेतले जाते.
share
(10 / 11)
पूजेदरम्यान शिव चालीसा आणि शिव मंत्राचा जप करावा. यानंतर तुपाचा दिवा लावून दिवसभर उपवास करावा. सूर्यास्तानंतर पूजा करा आणि नंतर फळ घ्या. या व्रतामध्ये अन्न घेतले जात नाही. दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतरच अन्न घेतले जाते.((फोटो सौजन्य पीटीआय))
शेवटी संध्याकाळी पूजा आणि आरती केल्यानंतर फळे खाऊ शकतात.  असे मानले जाते की कोकिळा व्रताच्या प्रभावामुळे विवाहित स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि अविवाहित मुलीला परिपूर्ण पती प्राप्त होतो.
share
(11 / 11)

इतर गॅलरीज