टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोमम्मद सिराज याला तेलंगणा सरकारने पोलीस उपअधीक्षक म्हणजेच डीएसपी बनवले आहे. टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये दमदार कामगिरी केल्याचे हे बक्षीस आहे.
आपल्या चाहत्यांमध्ये मियांभाई या नावाने प्रसिद्ध असलेला सिराज हा पोलिस खात्यात अशाप्रकारे नोकरी मिळवणारा पहिलाच क्रिकेटपटू नाही. अनेक खेळाडूंना अशा नोकरी मिळाल्या आहेत. आज आपण अशाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांना दमदार खेळाच्या बदल्यात पोलिसांत मोठ्या पदाची नोकरी मिळाली आहे.
जोगिंदर शर्मा - टी-20 विश्वचषक २००७ मध्ये पाकिस्तानच्या मिसबाह उल हक याची विकेट घेऊन हिरो बनलेला जोगिंदर शर्मा देखील पोलीस खात्यात आहे. हरियाणा सरकारने त्यांची डीएसपी पदावर नियुक्ती केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताने विश्वचषक जिंकूनही जोगिंदर शर्माला पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. ४ टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली.
हरभजन सिंग - अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग याालाही पोलिसांत मोठे पद मिळाले आहे. भारतासाठी १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ४१७, २६९ आणि २५ विकेट घेणाऱ्या भज्जीला पंजाब सरकारने डीएसपी पद दिले आहे. मात्र, आता ते आम आदमी पक्षाचा राज्यसभेचा खासदार आहे. अशा परिस्थितीत त्याने आता पोलिसाची नोकरी सोडली आहे.
हरमनप्रीत कौर - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर पंजाब पोलिसात डीएसपी होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महिला विश्वचषक २०१७ मधील चमकदार कामगिरीनंतर हरमनप्रीतची डीएसपी म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. पण नंतर तिची ग्रॅज्युवेशन पदवी बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने पंजाब सरकारला तिेच्याकडून डीएसपी पद काढून घेणे भाग पडले.
बलविंदर सिंग संधू - १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य बलविंदर सिंग संधू यांची महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) म्हणून नियुक्ती केली. मध्यमगती गोलंदाज बलविंदूर संधू यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. ६८ वर्षीय संधू यांनी भारतासाठी अनुक्रमे ८ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० आणि १६ बळी घेतले आहेत.