अन्न गरम ठेवण्याच्या हेतूने याचा वापर होत असेल तर मायक्रोवेव्हमध्ये अन्न ठेवताना ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करणे चुकीचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ॲल्युमिनियम फॉइलमध्ये आंबट पदार्थ साठवू नका. टोमॅटोची पेस्ट, आंबट फळे, आंबट रस पॅक करू नका. अन्नातील आंबट घटक ॲल्युमिनियम फॉइलशी प्रतिक्रिया देतात आणि अन्न विषारी बनवतात.
केक बनवायचा असेल तर ओव्हन वापरताना केकचं मिश्रण ॲल्युमिनियम फॉईलमध्ये टाकू शकता, पण ओव्हनमध्ये ठेवायचं असेल तर गरम करणं टाळा. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
जर तुम्हाला तुमचे शिजवलेले अन्न ताजे ठेवायचे असेल तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉइल वापरू शकता. कारण ते अन्नातील ओलावा बाहेर काढते. पण जास्त गरम करू नये.