Signs of High Cholesterol: जेव्हा कोलेस्ट्रॉल जास्त होते तेव्हा शरीरात अनेक आजार होऊ लागतात. या समस्येची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात, परंतु शरीराच्या कोणत्याही भागात अशी लक्षणे दिसल्यास त्वरित कोलेस्टेरॉलची तपासणी करा.
(shutterstock)
बॅड कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका - आहारातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण शरीरातील लठ्ठपणा तर वाढवतेच पण यकृतातील कोलेस्टेरॉलचे उत्पादनही वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो.
उपचाराने बरा होऊ शकतो - योग्य वेळी उच्च कोलेस्टेरॉल आढळून आले तर सक्रिय जीवनशैली, सकस आहार आणि औषधे वेळेवर घेतली, तर बॅड कोलेस्ट्रॉलच्या समस्येला तोंड देता येईल.
डोळ्यांत दिसतात बॅड कोलेस्टेरॉलची लक्षणे - डोळ्याभोवती पिवळ्या रंगाचे बम्प, जे फॅटच्या रंगाचे दिसतात. हे हाय कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे.
चेहऱ्यावरही दिसतात बम्प्स - डोळ्यांशिवाय चेहऱ्यावरही हे बम्प दिसतात. ज्यामुळे वेदना होत नाहीत परंतु हे बम्प रक्तातील चरबी दर्शवतात.
बॅड कोलेस्टेरॉलची लक्षणे - जर डोळ्यांच्या रंगीत भागाभोवती निळी, ग्रे, किंवा पांढऱ्या रंगाचे सर्कल दिसले तर ते हाय बॅड कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. वयानुसार ही वर्तुळे पुरुषांमध्ये अधिक दिसतात.
हातावर दिसतात बॅड कोलेस्टेरॉलची ही लक्षणे - बॅड कोलेस्ट्रॉलची लक्षणे हातावर सुद्धा दिसतात. बोटांच्या पेरांच्या आसपास सूज येणे सामान्य आहे, ज्यामध्ये वेदना देखील असतात.