
ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ख्रिसमस दरम्यान केक जवळजवळ सर्व घरांमध्ये बनवला जातो. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आल्यावर केक बनवण्याची मजाच वेगळी असते. केक स्टोअरमधून विकत घेतल्यासारखा केक बनवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
जगभरात साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमसला अवघे काही दिवस उरले आहेत. या दिवशी अनेकजण आपल्या घरी केक बनवतात. काही घरांमध्ये संपूर्ण कुटुंब मिळून केक बनवतात. काहीवेळा जेव्हा प्रत्येकजण मेनाकेट तयार करतो आणि केक दगडासारखा होतो. पण हे असं होऊ नये आणि केक सॉफ्ट तयार करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
केक तयार करताना केवळ त्यात टाकल्या जाणाऱ्या पदार्थांचीच काळजी न घेता केक बनवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे डबे वापरतो हे बघणे ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच तापमान योग्य ठेवले नाही तर उत्तम केक न मिळण्याची शक्यता असते.
केक बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचे प्रमाण योग्य ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत जास्त प्रमाणात, चवीनुसार पदार्थांचे प्रमाण वाढवू नका. अंडी आणि पिठाचे मिश्रण ळगुळीत असावे.


