जेवणानंतर अनेकांना विड्याचे पान खाणे आवडते. बहुतेक लोक विड्याचे पान मुखवास म्हणून खातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, हे पान अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. विड्याचे पान खाल्ल्याने अंगदुखी आणि युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते. या पानाचे इतर अनेक फायदे काय आहेत ते येथे जाणून घ्या.
विड्याचे पान ही प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यात टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड आणि फिनाइल सारखे अनेक पोषक घटक असतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही विड्याच्या पानाचे सरबतही घेऊ शकता.
पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यासाठी विड्याचे पान खूप फायदेशीर आहे. विशेषत: यामुळे पचनशक्ती वाढते.
विड्याचे पान चावून खाल्ल्याने दातांच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. पण ते खाण्यापूर्वी लक्षात ठेवा की सुपारी, तंबाखू, चुना वगैरे टाकू नये.
विड्याचे पान चावून खाल्ल्याने हिरड्यांना सूज येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. यात असलेले घटक हिरड्यांची सूज कमी करतात.