बाजारात आंब्याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री देखील अनेक जण आंबे खात असतात. पण सतत आंबा खाणे योग्य आहे का? विशेषत: रात्री आंबा खावा का?
आंबा हे एक स्वादिष्ट आणि फायदेशीर फळ आहे. त्याबद्दल कुणालाच शंका नाही. पण रात्री आंबा खाल्ल्याने काय परिणाम होतो? आंबा खाण्यापूर्वी हे चांगले जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर रात्री आंबा खायचा की नाही हे तुम्ही ठरवाल. जाणून घ्या रात्री आंबा खाण्याचा परिणाम काय होतो.
वजन वाढू शकते: मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे १५० कॅलरीज असतात. रात्री आंबा खाल्ल्याने कॅलरीचे प्रमाण कित्येक पटीने वाढू शकते. यामुळे वजन वाढू शकते. म्हणूनच आंबा रात्री न खाता दिवसा खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. रात्री आंबे खाल्ल्यानंतर सहसा झोपायला जातो आणि कष्ट होत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी खर्च होत नाहीत. ते चरबीच्या स्वरूपात साठवली जातात.
शरीराचे तापमान वाढवते: रात्री आंबा खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. त्यामुळे याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. शिवाय अनेक वेळा अशा सवयींमुळे मुरुमांच्या समस्याही उद्भवतात. त्यामुळे जर तुम्हाला आधीच त्वचेची काही समस्या असेल तर रात्री आंबा खाण्याबाबत सावध राहा.
मधुमेह असलेल्या लोकांना समस्या उद्भवू शकतात: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेची पातळी किंवा रक्तातील साखरेची पातळी सांभाळणे महत्वाचे आहे. ज्यांना अशा समस्या आहेत, त्यांनी आंब्याच्या सेवनाच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे. विशेषत: रात्रीच्या वेळी आंबा पूर्णपणे टाळावा. कारण आंबा खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.
अपचन होऊ शकते: आंबा स्वादिष्ट असला तरी तो रात्री खाणे टाळा. कारण रात्री आंबा खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. अनेकदा जेवल्यानंतर लगेच आंबा खाल्ल्याने पचनही खराब होऊ शकते. त्यामुळे आंबा खायचा असेल तर दुपारच्या वेळी खावा. तथापि जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर आंबा खाणे चांगले. हे पचनासाठी चांगले राहील आणि पचन खराब होण्याची भीती राहणार नाही.