Fennel Seeds Effects on Body: पचनाच्या आरोग्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. पोट फुगणे, अपचन, गॅस आणि छातीत जळजळ इत्यादीसाठी हे उत्तम आहे.
(1 / 5)
अनेकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. तर काही जण सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप भिजवलेले पाणी पितात.
(2 / 5)
बडीशेप चावून खाल्ल्याने श्वासाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळू शकते. बडीशेपमध्ये नैसर्गिक अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांच्या आरोग्याचे रक्षण होते.
(3 / 5)
सकाळी उठल्यानंतर अनेकांना चक्कर येणे, मळमळ होणे आणि थकवा जाणवतो. याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. गरोदरपणात अनेक महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप मदत करते.
(4 / 5)
बडीशेपचे पाणी किंवा चहा प्यायल्याने लठ्ठपणापासून सुटका मिळू शकते. बडीशेप वजन कमी करण्यास मदत करतात.
(5 / 5)
बडीशेप शरीराची सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप भिजवलेले पाणी पिऊ शकता.