डाळिंब हे विविध पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या फळांपैकी एक आहे, जे अनेक आजारासाठी फायदेशीर ठरू शकते. डाळिंब केवळ टेस्टीच नाही तर ते खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि चांगली झोप वाढवण्यास मदत करते. हार्वर्ड-प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ, व्यावसायिक शेफ आणि पोषणतज्ञ डॉ. उमा नायडू यांनी डाळिंब खाण्याचे फायदे सांगितले आहे.
(Freepik)डाळिंबामध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे जळजळ दूर करते. तसेच मेंदूचे आरोग्य अनेक प्रकारे वाढवतात.
संशोधनात असे दिसून आले आहे की डाळिंबातील एलाजिटानिन्स, एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आणि आतड्यांतील मायक्रोबायोटा-व्युत्पन्न मेटाबोलाइट्स हे अल्झायमर रोगाविरूद्ध न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव दर्शवतात.
(Unsplash)डाळिंबातील मॅग्नेशियमची उच्च पातळी चांगली झोप वाढविण्यात आणि निद्रानाशाची लक्षणे कमी करण्यात मदत करते. मॅग्नेशियम स्नायूंना आराम करण्यास आणि मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते.
(Unsplash)