नेहमीच्या चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेट्स किंचित कडू असतात. पण हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. दररोज डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा खाण्याची सवय लावा. मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे.
एका डार्क चॉकलेटमध्ये ७०० कॅलरीज असतात. २४ ग्रॅम साखर असते. अलीकडील अभ्यासानुसार कमी साखर असलेले डार्क चॉकलेट खाणे शरीरासाठी चांगले असते.
जे लोक रोज डार्क चॉकलेट खातात त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे मुलांना नेहमीच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खायला द्या.
डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. हे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. .हृदयाच्या समस्या टाळता येतात.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो. नैराश्य आणि तणावाने ग्रस्त असलेले लोक डार्क चॉकलेट खाल्ल्याने उत्साहित आणि आनंदी राहतात.
डार्क चॉकलेट मेंदूसाठी खूप चांगले आहे. हे मेंदूला योग्य रक्तपुरवठा सुनिश्चित करते. त्यामुळे मेंदूसाठी सुद्धा ते खूप आरोग्यदायी आहे.